शिवाचार्यांच्या मारेकर्यांना ताबडतोब अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करा अन्यथा राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन करु: - शिवानंद हैबतपूरे
उदगीर /प्रतिनिधी
शिवसंस्कृतीचे प्रचारक पुज्य श्री गुरु रुद्रपशुपती शिवाचार्य महाराज नागठाणकर यांची काल दि २३ मे रात्री निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. शिवाचार्यांच्या मारेकर्यांना ताबडतोब अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करा अन्यथा राज्यभर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आंदोलन कारणार असल्याचा इशारा शिवानंद हैबतपूरे दिला आहे
नांदेड जिल्ह्य उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथे मारेकरी हे मठात घुसून मठाधिपतीना मारतात, त्यांची हत्या करतात ही बाब अतिशय गंभीर आहे. या विषयावर सरकारने विशेष करुन पोलीस प्रशासनाने ताबडतोब मारेकर्यांचा शोध घ्यावा. त्यांना तात्काळ अटक करुन त्यांच्यावर कडक कारवाई करणे प्रसंगी या संदर्भात मारेकर्यांना फासावर लटकावले पाहिजे अशी मागणी आम्ही लिंगायत आंदोलनाच्या वतीने आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करित आहोत.जर शासन या वर वेळीच कारवाई करत नसेल तर लिंगायत आंदोलनाच्या वतीने व वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही समाजासह रस्त्यावर उतरु असा इशारा लिंगायत आंदोलनाचे नेते व वंचित बहुजन आघाडीचे महासचिव शिवानंद हैबतपूरे यांनी दिला आहे.
श्री गुरु रुद्रपशुपती शिवाचार्यांची हत्या व मठावर झालेला हल्ला हा शिवसंस्कृतीचा मोठा अवमान असून याविषयी वंचित बहुजन आघाडी गंभीर आहे. लिंगायत धर्माच्या आस्थेचे प्रतीक असणार्या मठावर आणि मठाधिपती वर राजरोसपणे हल्ले होत असताना आता स्वस्थ बसून चालणार नाही. या संदर्भात शासन त्वरित कारवाई करत नसेल तर लाँकडाऊन चे सर्व नियम तोडून वंचित बहुजन आघाडी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल. अशी माहिती वंचित बहुजन आघाडी च्या वतीने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली.