रोहयोच्या कामाबाबत सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या पाठपुराव्याला यश
मुंबई /प्रतिनिधी
कोरोना रोगाच्या प्रादुर्भावमुळे महाराष्ट्रातील नागरिकांना काम मिळत नाही. त्याचबरोबर दुष्काळात देखील लोकांना काम मिळत नसल्याने पूर्वी देखील मोठ्याप्रमाणात नागरिक स्थलांतर करत असत याबाबत तत्कालीन विधानपरिषद उपसभापती आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. आ.डॉ.गोऱ्हे ह्या उपसभापती यापदावर असताना तत्कालीन रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर तसेच सध्याचे रोहयोमंत्री संदिपान भुमरे यांच्या सोबत बैठक घेतल्या होत्या. तसेच मजुरांना काम मिळताना शासकीय किचकट प्रक्रियातून जावे लागत असत. याबाबत देखील आ.डॉ.गोऱ्हे यांनी व्हाट्सएपवर देखील कामाचे मागणी पत्र आले तर ते मान्य करण्याची सूचना देखील त्यांनी केली होती. आज याची पूर्तता झाल्याचे चित्र मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार श्रमिकांच्या ४६ हजार कामांवर ५ लाख ९२ हजार मजुरांची उपस्थित असल्याचे चित्र दिसत आहे. तसेच आ.डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री ठाकरे साहेबांच्या कार्यालयात देखील याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहेत. त्याचप्रमाणे विधवा व एकल महिलांना त्यांच्या शेतात कामे मंजूर करून देण्याबाबत निर्णय घेण्याची विनंती देखील आ.डॉ.गोऱ्हे यांनी विनंती केली आहे.
मनरेगा कामकाजाबाबतच्या बैठका कोकणातील शेतातील बांध, शेततळे व खारपठ्यातील रस्ते यांना कामांना मंजुरी द्यावी त्याचबरोबर विदर्भातील वन विभागातील वनबंधारे व इतर कामे सुरू करावीत अशी मागणी केली होती, या मागण्या मान्य झाल्याचे चित्र आहे. याबाबत आ.डॉ.गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे आभार मानले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोठ्याप्रमाणात मजुरांचे स्थलांतर होत आहे. स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नाबाबत जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर, यांच्या सहकारी सुनाती सु रा ह्या सातत्याने काम करत आहेत. याबाबत मजुरांना पायी चालत हजार किलोमीटर जावे लागत असल्याबाबत श्रीमती पाटकर ताईने उपोषण देखील केले होते. हे उपोषण मागे घेण्याबाबत आणि मजुरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी डॉ.गोऱ्हे यांनी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. मेधाताईने एक वाहिनीला मुलाखत देताना डॉ.गोऱ्हे यांने केलेल्या सहकार्यबद्दल आभार देखील मानले होते. यापुढे देखील मजुरांच्या प्रश्नाबाबत संपूर्ण सरकारकडून सहकार्य करून देण्याचे आश्वासन डॉ.गोऱ्हे यांनी नर्मदा बचाव आंदोलन समन्वय नेत्या मेधाताईं पाटकरांना ना दिले आहे.
रोहयो योजनेच्या कामातील आढावा व सहकार्य करणारे तसेच राज्य स्तरावर मिनार पिंपळे, शिरीष कुलकर्णी, कोकण विभागातून अरुण शिवकर, वैशाली पाटील मराठवाड्यातून रमेश भिसे, संतोष राऊत, कुशावती बेळे, पश्चिम महाराष्ट्रातुन प्रमोद झिंजाडे , विदर्भातून किशोर मोघे, दिलीप गोडे हे पाठपुरावा करत आहेत. तसेच डॉ.गोऱ्हे यांच्या कार्यालयातून प्रत्येक दहा दिवसाला यासंदर्भात आढावा घेतला जात आहे. रोहयोची कामे मिळण्यात कोणाला काही अडथळे येत असतील तर त्यांनी ईमेल आयडी- neeilamgorhe@gmail.com किंवा neelamgorheoffice@gmail.com यावर ई-मेल करण्याचे आवाहन डॉ.गोऱ्हे यांनी केले आहे.