ग्रामीण भागात कोरोना चा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे - राज्यमंत्री संजय बनसोडे
उदगीर/ प्रतिनिधी
देशात चौथ्या लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात सुट शासनाने दिली आहे त्यामुळे शहरी भागातील नागरिक आपल्या गावी ग्रामीण भागात येत आहेत. या नागरिकांची तपासणी करावी तसेच काही कोरोनाचे लक्षणे असतील तर त्यांना लगेच क्वारंटाईन करून तपासणी करावे अशा सुचना राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या.
उदगीर तालुक्यातील चिमाचीवाडी येथे बाहेर गावाहुन आलेल्या व्यक्तीला कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली या पार्श्वभूमीवर चिमाचीवाडी येथे राज्याचे पर्यावरण व पाणी पुरवठा राज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजयजी बनसोडे यांनी भेट दिली. यावेळी ळी जिल्हापरिषद अध्यक्ष राहुलजी केंद्रे, कल्याण पाटील, अप्पर जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी, तहसीलदार व्यंकटेश मुंडे, गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण, एपीआय बाळासाहेब नरवटे, जोंधळे, उपस्थित होते. यावेळी राज्य मंत्री. संजय बनसोडे यांनी प्रशासनाने केलेल्या उपाय योजनाचा आढावा घेतला.प्रतिबंधात्मक क्षेत्रातील नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा बदल नियोजन करावे, ज्या व्यक्तीचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे त्याच्या संपर्कात आलेल्या सर्व लोकाचे स्वॅब तपासणी साठी पाठवावे, गावातील सर्व नागरिकांची प्राथमिक आरोग्य तपासणी करावी.तसेच आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांच्या टिम तयार कराव्या , गावात जंतुनाशक फवारणी करावी, स्थानिक प्रशासनातील तलाठी व ग्रामसेवक यांनी आपले मुख्यालय सोडु नये ग्रामीण भागात करोनाचा संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेण्याच्या सुचना राज्याचे राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या आहेत.